छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्यांच्या दुकानाला आग : सात जणांचा होरपळून मृत्यू


Garment shop fire in Chhatrapati Sambhajinagar : Seven people died छत्रपती संभाजीनगर : एकाच कुटुंबातील सात जणांचा कपड्यांच्या दुकानातील आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये आज बुधवारी पहाटे घडली. कपड्यांच्या दुकानाला आग लागल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुकानामध्ये नेमक्या कोणत्या कारणाने आग लागली, हे अजून समजलेलं नाही.

आगीने शहरात खळबळ
छत्रपती संभाजीनगरमध्ये छावणी परिसरात छावणी दाना बाजार गल्लमध्ये महावीर जैन मंदिरच्या बाजूला हे कपड्याचं दुकान होतं. या दुकानात पहाटे अचानक आग लागली. या आगीमुळे सात जणांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये दोन मुले, दोन पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांनी धाव घेतली.



घाटी रुग्णालयात मृतदेह दाखल
पोलीस आणि अग्निशमन दल पोहोचेपर्यंत सात जणांचा मृत्यू झाला होता. सर्व मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले होते. आता त्यांचे मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्यामुळे स्थानिकांमधून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

मृतांची नावे अशी
आसीम वसीम शेख (3 वर्ष), परी वसीम शेख (2 वर्ष), वसीम शेख (30), तन्वीर वसीम (23), हमीदा बेगम (50), शेख सोहेल (35), रेश्मा शेख (22) अशी मृतांची नावे आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !