धुळे जिल्ह्यात खाजगी बसचा अपघात : दिड महिन्यांच्या शिशूसह तिघे ठार


Private bus accident in Dhule district : Three killed, including one-and-a-half-month-old baby धुळे : धुळे जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थानातून हैद्राबादकडे प्रवाशांना घेवून निघालेल्या बसचा अपघात झाल्याने या अपघात माय लेकासह तिघे ठार झाल तर अन्य 19 प्रवासी जखमी झाले. हा अपघात चौगाव गावाजवळील खंडेराव बारीत बुधवारी दुपारी एक वाजता घडला

बस उलटून तिघे ठार
राजस्थानातून हैद्राबादच्या दिशेने खासगी बस (क्र.ए.आर. 11 बी 5851) जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून बस धुळे तालुक्यातील चौगाव गावाजवळ रस्त्याच्या बाजुला उलटली. या अपघातात पूजा (वय 32), तिचा दीड महिन्याचा शिशू व चालकाचा मृत्यू ओढवला.

या अपघातात गोविंदसिंग (18), टोकसिंग (18), रमेशकुमार (32), भरतसिंग (43), महेशकुमार (7), नीलेशकुमार (6), गुड्डीदेवी (35), हॅपीसिंग (22), महावीरकुमार (22), सुरेशसिंग (26), शुभम (8), सागवीचेतन (6), मोहलदेवी (6), मोतीसिंग (21), हरीश तेवासी (18), मनोहरसिंग (20), प्रकाशसिंग (18), अनुपसिंग (30), जिताराम (27) हे प्रवासी जखमी झाले आहेत.


कॉपी करू नका.