भुसावळात रेल्वेतर्फे 18 जूनला पेन्शन अदालत


Pension Adalat on June 18 by Railways in Bhusawal भुसावळ : रेल्वेतील निवृत्त कर्मचार्‍यांच्या तक्रारी कमी करण्यासाठी उत्तम प्रशासनाचा भाग म्हणून पेन्शन अदालतीचे आयोजन 18 जूनला सकाळी 11 वाजता डीआरएम कार्यालयात होणार आहे. पेन्शन धारकांच्या तक्रारींचे शासनाच्या वर्तमान दिशा निर्देशानुसार तत्परतेने निराकरण केले जाईल. पेन्शन अदालतीमध्ये केवळ पेन्शनशी संबंधित प्रकरणेच घेतली जातील, (पॉलिसी बाबींचा समावेश असलेली तक्रार (उदा. कौटुंबिक पेन्शन प्रकरणे, नाव समाविष्ट प्रकरणे आदी), कायदेशीर मुद्दे (न्यायालयातील प्रकरणे) पेन्शन अदालतमध्ये घेता येणार नाहीत. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून जे कर्मचारी निवृत्त झालेले आहेत आणि पेन्शन व सेटलमेंट बाबत तक्रारी असलेले कर्मचारी त्यानी आपल्या तक्रारींचे अर्ज (तीन प्रतीत) मंडळ रेल्वे प्रबंधक (कार्मिक) भुसावळ यांना पाठवू शकतात.

अर्जात आपले नाव, पद, भरती तारीख, बँक खाते क्रमांक, बँक आयएफएससी क्रमांक आणि आपल्या तक्रारींचे स्वरूप आदी नमूद करावे. अर्जासोबत पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ), बँकेच्या पेन्शन स्लिपची, पास बुकची झेरॉक्स तसेच आवश्यक दस्तावेज जोडावी. तक्रारदारांनी डीआरएम कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील ड्रॉप बॉक्स मध्ये अर्ज सादर करण्याची शेवटची मंगळवार, 30 एप्रिल 2024 आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !