भेकर प्रजातीच्या हरीणाचे मांस शिजवले : आरोपी वनविभागाच्या जाळ्यात

0

Cooked deer meat of Bhekar species : Accused in forest department net यावल : भेकरी प्रजातीच्या हरणाचे मांस शिजवणार्‍या एकाला वनविभागाने अटक केली आहे. ही कारवाई गुप्त बातमीवरुन काळाडोह पाड्यावर करण्यात आली. हवालदार नहारसिंग बारेला असे अटकेतील आरोपीचे नाव आहे

आरोपीला एका दिवसाची कोठडी
आरोपी काळाडोह पाड्यावर त्याच्या राहत्या घरात भेकर प्रजातीचे हरीणाचे मांस शिजवताना रंगेहाथ आढळल्याने त्यास अटक करण्यात आली. आरोपीविरोधात वनपाल डोंगरकठोरा यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यास गुरुवारी यावल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची वन कोठडी सुनावली.

आरोपीची चौकशी सहा.वन संरक्षक प्रथमेश हाडपे करीत आहेत. ही कार्यवाही यावल उपवनसंरक्षक जमीर शेख, यावल सहा.वन संरक्षक प्रथमेश हाडपे, यावल वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल. या कारवाईत यावल पूर्व वनक्षेत्रातील अधिकारी व सर्व क्षेत्रीय कर्मचारी सहभागी झाले.


कॉपी करू नका.