जळगावच्या शिवाजीनगर हुडकोत तरुणावर शस्त्राने वार


जळगाव : स्टॉपवर असलेल्या पान टपरीवर चालक तरुणावर मद्यप्राशन केलेल्या संशयिताने शिवीगाळ करत पाठीवर धारदार शस्त्राने वार केला. मंगळवार, 2 रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास ही घटना शिवाजीनगर हुडको परिसरात घडली. सागर जनार्दन गव्हाणे रा.हुडको असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी बुधवार, 3 शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

किरकोळ वादातून हल्ला
जळगावच्या शिवाजीनगर हुडकोत तरुणावर शस्त्राने वारसागर हे पानटपरीवर व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते पानटपरीवर उभे असताना गजानन विलास बाविस्कर हा याठिकाणी आला. त्याने त्याच्या हातातील धारदार वस्तूने त्यांच्या पाठीवर तसेच उजव्या हाताच्या मनगटावर, डाव्या हातावर वार करत जखमी केले. जखमीला शिवीगाळ करत पुन्हा त्याच्या दिशेने हत्यार घेवून धावला असता जखमी जीव वाचवून पळाला. संशयिताने दारु प्राशन केली होती. या प्रकरणी त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !