अमळनेर शहरात गिप्टच्या दुकानाला आग : लाखोंचे नुकसान
Fire at Gypt shop in Amalner town : Loss worth lakhs अमळनेर : अमळनेर शहरातील शिवसागर टॉईज व गिफ्टच्या दुकानाला शॉर्टसर्कीटमुळे भीषण आग लागली. आगीमुळे दुकानदारांचे लाखोंचा मुद्देमाल जळाल्याने मोठे नुकसान झाले. अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.
रात्रीच्या सुमारास लागली आग
अमळनेर शहरातील शिवसागर टॉईज व गिफ्ट दुकान बंद असतांना गुरुवार, 4 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता शॉर्टसर्कीटमुळे अचानक आग लागली. ही आग लागल्याचे कळल्यानंतर दुकानदाराने अग्निशमन विभागाला कळविले. अवघ्या 15 मिनिटात अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर रात्री 11 वाजता ही आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत हजारो रुपये किंमतीचे ईलेक्ट्रीक खेळणे, सीसीटीव्ही कॅमेरा, कॉम्प्यूटर, प्रिंटर, लहान मुलांची खेळणी, फर्निचर, इर्न्हर्टर बॅटरी सर्व जळून खाक झाले होते. याप्रकरणी शुक्रवार, 5 एप्रिल रोजी मध्यरात्री 12.30 वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. पुढील तपास अशोक साळुंखे करीत आहे.

