नाथाभाऊ स्पष्टच बोलले ; भाजपा हे तर माझे घर ! नाराजी दूर झाली आता लवकरच स्वगृही प्रवेश करणार !

0

Enter the house I built soon! : Candor of senior leader Nathabhau भुसावळ (गणेश वाघ) : भाजपामधून राष्ट्रवादीत दाखल झालेले हेवीवेट नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी पुन्हा घरवापसी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे खान्देशासह उत्तर महाराष्ट्रात आता आणखी भाजपाची ताकद दुपटीने वाढली आहे. लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर आमदार खडसे यांचा प्रवेशामुळे पक्षाला मोठा फायदेशीर ठरणार असून राष्ट्रवादीला मात्र मोठा हादरा बसला आहे. आमदार एकनाथराव खडसे यांनी भाजपा प्रवेशाचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांच्याशी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ प्रतिनिधीने संवाद साधला असता नाथाभाऊ म्हणाले की, मी भाजपमध्ये प्रवेश करतो आहे, हे खरे आहे. भाजपा हे घर असून हे घर मीच बांधले आहे. या घराच्या पायापासून तर लिंटलपर्यंत सर्व काही माझ्या काळात झाले आहे. माझ्या घरातून मी नाराजीमुळे बाहेर पडलो मात्र आता मी माझ्या हक्काच्या घरात (स्वगृही) लवकरच परततोय, असे ते म्हणाले.

होय स्वगृही परततोय
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. त्याबाबत संकेतही मिळत होते मात्र शनिवारी एकनाथ खडसे यांनी आपल्या घरवापसीवर शिक्कामोर्तब केले. मुंबईत त्यांनी भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट केले मात्र प्रवेश सोहळ्याबाबत ते म्हाले की, आणखी आठ ते दहा दिवसात निश्चित प्रवेश सोहळा होणार आहे.

भाजपा हे घर, ते मी बांधले
आमदार खडसे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, भाजपा हे घर असून ते मी बांधले आहे. या घराच्या पायापासून माझे योगदान आहे. माझ्या घरातून मी नाराजीमुळे मी बाहेर पडलो मात्र आता माझी नाराजी दूर झाली आहे व आठ दिवसात मी माझ्या हक्काच्या घरात परतत आहे. लवकरच आपण आपल्या घरी जाणार असून त्याबाबतची घोषणा आपण जाहीरपणे करू, असे त्यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.


कॉपी करू नका.