नागपूरात खळबळ : एसआरपीएफ निरीक्षकांची गोळी झाडून आत्महत्या
SRPF inspector shot and committed suicide नागपूर : नागपूरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एसएलआरने फायर करून एसआरपीएफ ग्रुप नं. 4 च्या ड्रील इन्स्पॅक्टरने आत्महत्या केली. ही घटना वाडी पोलिस ठाण्यांतर्गत शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सुराबर्डी येथील अपारंपारीक प्रशिक्षण केंद्रात (युओटीसी) घडली. मंगेश मस्की (35, रा. युओटीसी क्वार्टर, सुराबर्डी) असे आत्महत्या केलेल्या एसआरपीएफ निरीक्षकाचे नाव आहे.
जागीच झाला मृत्यू
सुराबर्डी येथील युओटीसी केंद्रात ड्रील इन्स्पॅक्टर म्हणून कार्यरत असलेले मंगेश म्हस्की यांनी टोकाचे पाऊल का उचलले ? हे कळू शकलेले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांच्या पत्नीही वाडी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मंगेश मस्की याने आपल्याजवळ असलेली एसएलआर मानेखाली ठेऊन एक राऊंड फायर करताच गोळी त्यांच्या डोक्यातून आरपार निघून त्याचा जागीच मृत्यू झाला.


फायरींगचा आवाज ऐकल्यानंतर त्याचे सहकारी धाऊन गेले असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. या घटनेची माहिती तातडीने वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना देण्यात आली. वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि वाडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.