मांडळ गावात चोरट्यांचा उच्छाद : मध्यरात्री पाच घरे फोडली


Thieves raid in Mandal village : Five houses were broken into in the middle of the night अमळनेर : शहरी भागातून चोरट्यांनी आता ग्रामीणमध्ये मोर्चा वळवल्याचा प्रकार अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे उघडकीस आला. एकाच रात्री पाच बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि ईलेक्ट्रीक मोटारी असा एकूण तीन लाख 67 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाचवेळी पाच ठिकाणी घरफोड्या
अमळनेर तालुक्यातील मांडळ गावात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. यात पाच जणांच्या घरात चोरी झाल्याचे शनिवार, 6 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उघडकीला आले. नितीन मोतीलाल पाटील यांच्या घरातून 60 हजार 500 रुपयांचे दागिने आणि दोन लाख 20 हजारांची रोकड, टिनाबाई हेमंत ठाकूर यांच्या घरातून 10 हजार रुपये, महेश नामदेव ठाकूर यांच्या घरातून 50 हजार रूपये, नरेश मधुकर कुळकर्णी यांच्या घरातून 25 हजार रूपये आणि गुलाब निळकंठ पाटील याच्या घरातून दोन हजार रूपये किंमतीची पाण्याची मोटार असा एकुण सुमारे तीन लाख 67 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले. याप्रकरणी अखेर नितीन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !