भुसावळातील अव्वल पुरवठा कारकुन जळगाव एसीबीच्या जाळ्यात


रेशन दुकानदाराकडून स्वीकारली 1500 रुपयांची लाच

भुसावळ : भुसावळ तहसील कार्यालयातील पुरवठा अव्वल कारकून रवींद्र विनायक तारकस (57, हकीमी कॉम्लेक्स, जाम मोहल्ला, शालिमार हॉटेलजवळ, भुसावळ) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयातून एक हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या कारवाईने तहसील कार्यालयातील लाचखोर अधिकारी, कर्मचार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. स्वस्त धान्य दुकानदाराकडून लाच मागताना ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश लोधी, मनोज जोशी, प्रशांत ठाकूर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्‍वर धनगर, महेश सोमवंशी आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.