यावल महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा अपघातात दुदैवी मृत्यू
Unfortunate death of Yaval College student यावल : यावल महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीचा सातपुड्यातील लगडा आंबा येथे अपघातात दुदैवी मृत्यू झाला आहे. रेतना दिनेश बारेला असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. आजारी असल्याने ती दुचाकीव्दारे रुग्णालयात येत होती व दुचाकीवरून पडल्याने डोक्यास दुखापत होवुन तिचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडली.
अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू
यावल येथे फैजपूर रस्त्यावर जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहेे. या महाविद्यालयात पदवीच्या तृतीय वर्षात हिंदी विभागात रेतना दिनेश बारेला (रा.लंगडाआंबा) ही विद्यार्थीनी शिक्षण घेते व ती शहरातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय संचलित आदिवासी मुलींचे वस्तीगृहात वास्तव्यास होती. दोन दिवसांपूर्वी तब्बेत बरी नसल्याने ती लंगडाआंबा येथे घरी गेली होती. अचानक तब्येत खालावली असल्याने तिचे वडील दिनेश बारेला हे तिला सोमवारी मोटारसायकल वरून दवाखान्यात उपचारासाठी नेत असतांना गावापासून काही अंतरावर सातपुड्याच्या जंगलात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला व यात रेतना बारेला हिच्या डोक्याला मार बसल्याने तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलीस पाटील यांना देण्यात आली व पंचनामा करून घेण्यात आला.


