कुर्हा परिसरात वादळी पाऊस : केळीसह पिकांचे नुकसान : अनेक घरांवरील पत्रे उडाली
घरांची पडझड : अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडाली : पंचनाम्यांचे आदेश
Stormy rains in Kurha area : Damage to crops including bananas : Leaves blown off many houses
कुर्हाकाकोडा : कुर्हा परिसरात वादळी वार्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी दिल्याने केळीसह शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. मंगळवार, 9 रोजी संध्याकाळी पाच वजेच्या सुमारास कुर्हा परिसरात झालेल्या जोरदार वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावल्याने या परिसरातील शेतकर्यांच्या शेतातील गहू मका ज्वारी अश्या पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी घरावरील तीन पत्रे उडाले तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली.
शेतकर्यांना मोठा फटका
दुर्गादास सोनवणे यांच्या गोडावूनवरील तीस ते चाळीस टिन पत्रे उडाल्याने त्यांच्या गोडाऊनमध्ये असलेली त्यांची कापशी पूर्ण पने पावसात भिजल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेख रईस शेख मजहर यांच्या शेतातील कापणीवर आलेली केळी पिकाचे शंभर खोड पडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. परिसरातील शेतकर्यांचे झालेले नुकसान पाहता पंचनामा करून तात्काळ मदत मिळण्याची मागणी शेतकर्यांकडून होत आहे.


वनक्षेत्रपालांच्या निवासावर पत्रे उडाली
या परिसरात अनेक ठिकाणी झाडे पडल्याने व वीज तारा तुडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या कर्मचारी यांनी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. जोरदार वादळी वार्याने एस.आर.पेट्रोलियम पंपावरील पेट्रोल भरण्याची मशीन पेट्रोल भरीत असलेल्या वाहनावर पडली मात्र सुदैवाने जीवित हानी टळली. कुर्हा-मुक्ताईनगर रस्त्यावर अवकाळी आलेल्या चक्रीवादळाने बाभूळीचे मोठे झाड उन्मळून पडल्याने रस्ता वाहतूक ठप्प झाली. तत्काळ जेसीबीच्या सहाय्याने झाड बाजुला करुन वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू झाली.
