भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी तक्रारदाराला पाकिट केले परत
भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीजवळ तिकीट काढत असताना दीपक रामकृष्ण राणे (भुसावळ) यांचे चोरट्यने 7 जून 2019 रोजी पाकिट लांबवले होते. या प्रकरणी आरोपी शेख रईस शेख रशीद (भुसावळ) यास अटक केल्यानंतर त्याच्या ताब्यातून रोख रकमेसह एटीएम व पाकिट जप्त हस्तगत करण्यात आले होते. रेल्वे न्यायालयाच्या आदेशाने हे पाकिट तक्रारदाराला मंगळवारी पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या उपस्थितीत परत करण्यात आले.
