वैष्णोदेवी माता मंदिरात दानपेटी फोडत लाखो लांबवले
Lakhs were extended by breaking donation boxes in Vaishno Devi Mata Temple जळगाव : जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील वैष्णोदेवी माता मंदिरातील दानपेटी फोडून चोरटयांनी दीड लाखांपर्यंतची रक्कम चोरट्यांनी लांबवली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली.
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील कुर्हाडदे रोडवरील वैष्णोदेवी माता मंदिर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराला लावलेले तीन कुलुप तोडून दानपेटीतील एक ते दीड लाखापर्यंत रक्कम घेऊन पसार झाले आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी मंदिरातील सुरक्षा रक्षक भावसिंग बारेला हा आरती करण्यासाठी आला असता त्यांना हा प्रकार दिसला.


यानंतर भावसिंग बारेला याने मंदिराच्या संचालक राजु आबटकर, मधुकर आबटकर, भगवान बारी यांना कळविले. मागिल दीड ते दोन वर्षांपासून दानपेटीतील रक्कम काढलेली नव्हती. अंदाजे यात एक ते दीड लाखापर्यंत रक्कम असण्याची शक्यता आहे. दरम्यान मंदिरातील चांदीचे वैष्णोदेवी माता मूर्तीवरील छत्र, डिजिटल मोठा स्पिकर व इतर काही वस्तु सुखरुप आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.