मंगरूळ गावात धाडसी घरफोडी : 76 हजारांचा मुद्देमाल लांबवला
Daring house burglary in Mangrul village : 76,000 worth of property recovered अमळनेर : अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावात तरुणाचे बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे व चांदीचे दागिने मिळून 76 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवार, 10 एप्रिल रोजी पहाटे चार वाजता समोर आली. याप्रकरणी सकाळी 11 वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घरे चोरट्यांना पर्वणी
देवेंद्र प्रवीण पाटील (28, रा.मंगरूळ, ता.अमळनेर) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कामाच्या निमित्ताने मंगळवार, 9 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता ते घर बंद करून बाहेर गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत घराचा दरवाजाचे लोखंडी कुलूप तोडून घरातून सोन्याची पोत, कानातले दागिने, मंगळसूत्र आणि चांदीचा गोफ असा एकूण 76 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार बुधवार, 10 एप्रिल रोजी पहाटे चार वाजता उघडकीला आला.


दरम्यान याप्रकरणी देवेंद्र पाटील यांनी अमळनेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार सकाळी 11 वाजता अज्ञात चोरट्यांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय संजय पाटील हे करीत आहे.