मुंबई ते छपरादरम्यान 22 विशेष ट्रेन धावणार

0

भुसावळ : उन्हाळी सुट्या व गर्दीचा हंगाम पाहता मुंबई ते छपरा दरम्यान 22 अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अशा धावणार गाड्या
05194 साप्ताहिक विशेष गाडी (11 फेर्‍या) 19 एप्रिल ते 28 जूनदरम्यान शुक्रवारी 9.40 वाजता पनवेल येथून सुटेल आणि तिसर्‍या दिवशी 8.50 वाजता छपरा येथे पोहोचेल. 05193 साप्ताहिक विशेष गाडी (11 फेर्‍या) 18 एप्रिल ते 27 जूनदरम्यान दर गुरुवारी 15.20 वाजता छपरा येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 8.30 वाजता पनवेल येथे पोहोचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, बनारस, वाराणसी, ज्ञानपूर शहर आणि बलिया स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


कॉपी करू नका.