धुळ्यात कौटूंबिक वादातून पत्नीची हत्या

0

Wife killed due to family dispute in Dhule धुळे : कौटुंबिक वादातनंतर आरोपी पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केली. ही धक्कादायक शहरातील नकाणे रोडनजीक शनिवार, 13 दुपारी ही घटना घडली. अनिता हिरामण बैसाणे (40) असे मृत विवाहितेचे नाव आहे तर या घटनेतील हिरामण बैसाणे असे संशयीत आरोपीचे नाव आहे.

कौटूंबिक वादातून खुनाचा अंदाज
धुळे शहरातील संभाजी महाराज नगराजवळ फुले कॉलनीत बैसाणे दाम्पत्य वास्तव्यास होते. आरोपी हिरामण बैसाणे हा व्यवसायाने पेंटर आहे तर पत्नी अनिता बैसाणे (40) या धुणी-भांडी करून कुटूंबाचा रहाटगाडा चालवत होत्या मात्र दाम्पत्यात कौटुंबिक वाद सातत्याने होत असल्याने प्रकरण न्यायालयात पोहोचले होते तर वर्षभरापासून ते पुन्हा एकत्र आले होते. दरम्यान, पती हिरामण वाल्मिक बैसाणे यांनी पत्नी अनिता बैसाणे या कामावरून परतत असताना त्यांना रस्त्यात गाठले व चाकूने गळा चिरून त्यांची हत्या केली. पांझरा नदी काठावरील समांतर रस्त्यावर ही घटना शनिवारी दुपारी ही घटना घडली. सहा.पोलीस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 


कॉपी करू नका.