नशिराबाद उड्डाणपुलावर दुचाकी अपघातात भुसावळातील तरुण ठार

0

A youth from Bhusawal was killed in a two-wheeler accident on the Nashirabad flyover जळगाव : जळगाव तालुक्यातील नशिराबाद जवळ उड्डाणपूलावर दुचाकी अपघातात भुसावळातील रहिवासी कामगार ठार झाला. हा अपघात शनिवारी घडला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली. मडीया उर्फ मन्साराम भावसिंग बारेला (24, रा.मलगाव, जि.खरगोन, मध्यप्रदेश, ह.ह.मुभुसावळ) असे मयताचे नाव आहे.

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
मडीया उर्फ मन्साराम बारेला हा तरुण भुसावळात आई-वडील, पत्नी, दोन मुलांसह वास्तव्यास होता. बांधकामांवर काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. शनिवार, 13 एप्रिल रोजी मडीया हा दुचाकीने एकटाच भुसावळ येथून जळगाव येथे काही कामानिमित्त निघाला असता दुपारी 12 वाजेच्या सुमारास नशिराबाद उड्डाणपुलाजवळ त्याचा भीषण अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहल दुगड यांनी तपासून मयत घोषित केले. यानंतर कुटुंबीयांनी मन हेलावणारा एकच आक्रोश केला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


कॉपी करू नका.