जळगावातील दोघा अल्पवयीन मुलांचा शिरागडच्या तापी पात्रात बुडून मृत्यू

0

Two minor children of Jalgaon drowned in the tapi tank of Shiragad यावल : शिरागड, ता.यावल येथील तापी नदीत बुडाल्याने दोघा अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही घटना घडली. रोहन काशीनाथ श्रीखंडे (17, रा.रामानंद नगर, जळगाव) व प्रथमेश शरद सोनवणे (17, वाघ नगर, जळगाव) अशी मयतांची नावे आहे.

पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले
सोमवारी दुपारी दोघांनी देवीचे दर्शन घेतले व त्या नंतर ते तापी नदीत अंघोळ करण्यास गेले मात्र दोन वाजेच्या सुमारास अचानक दोघे पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडाले.. तातडीने त्यांना तिथून नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले व यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉ.प्रशांत जावळे यांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शरद शिवराम सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी, भरत कोळी करीत आहे.


कॉपी करू नका.