नेवासा पोलीस ठाण्यातील लाचखोर नाईक एसीबीच्या जाळ्यात

0

Briber Naik of Nevasa Police Station in ACB’s net नेवासा : हाणामारीच्या प्रकरणात सहकार्य करण्यासाठी तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारताना नेवासा पोलीस ठाण्यातील नाईकाला अटक करण्यात आली तर लाच प्रकरणात दोन खाजगी पंटरांचा सहभाग आढळल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक तुकाराम भीमराव खेडकर (35, राधाकिसन गिरी यांचे घरात भाड्याने ,नेवासा फाटा, तालुका नेवासा, मूळ राहणार कोनोशी, ता.शेवगाव, जि.अहमदनगर) व खाजगी पंटर नंदू पांडुरंग सरोदे (देवसडे, ता.नेवासा, जि.अहमदनगर) व पोपट सरोदे अशी संशयीतांची नावे आहेत.

यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक छाया.के.देवरे, पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पोलीस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड, महिला पोलीस नाईक राधा खेमनर, महिला पोलीस कॉन्स्टेबल सना सय्यद. चालक पोलीस हवालदार दशरथ लाड आदींनी सापळा यशस्वी केला.


कॉपी करू नका.