धमकीचे कॉल अमेरीकेसह युपीतून : आमदार एकनाथराव खडसे

0

Threatening calls from UP with US: MLA Eknathrao Khadse मुक्ताईनगर : अमेरीका व युपी भागातून आपल्याला चार ते पाच धमकीचे फोन आले मात्र हे काम दाऊद अथवा छोटा शकील करेल, असे वाटत नाही कारण असल्या फालतू भानगडीत ते पडत नाही, हा कुणाचातरी खोडसाळपणा वाटतो मात्र तरीदेखील पोलिसांनी या प्रकाराची चौकशी करावी, असे आमदार एकनाथराव खडसे म्हणाले.  ते म्हणाले की, सुरक्षा वाढवावी, अशी मागणी आपण केलेली नाही मात्र आपण काळजी घेत आहोत व कार्यकर्तेदेखील आपल्यासोबत असल्याचे ते म्हणाले.

प्रचाराच्या रणधुमाळीत धमकीने खळबळ
आमदार खडसे हे भाजपाच्या वाटेवर आहेत. लवकरच त्यांचा प्रवेश सोहळा होणार आहेत तर त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे या रावेर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात आहेत. त्यात रावेर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रक्षा खडसे यांचे सासरे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना धमकीचे फोन आले दाऊद आणि छोटा शकील गँगच्या नावाने आल्याने राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे.

लवकरच होणार घरवापसी !
दरम्यान, आमदार एकनाथराव खडसे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये घरवापसी करणार असून लवकरच भाजपातील पक्ष प्रवेश हा दिल्लीतील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे मात्र अद्याप यासंबंधीची अधिकृत तारखेची घोषणा करण्यात आली नसलीतरी या आठवड्यात हा प्रवेश सोहळा होईल, अशी प्राथमिक माहिती आहे. आमदार खडसे पुन्हा एकदा कधी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागून आहे.


कॉपी करू नका.