चाळीसगाव तालुक्यात धावत्या रेल्वेच्या धक्क्याने अनोळखीचा मृत्यू

0

A stranger died after being hit by a running train in Chalisgaon taluka चाळीसागव : चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर रेल्वे स्टेशनजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अंदाजे 40 वर्षीय अनोळखी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर रेल्वेस्टेशन जवळील डाऊन रेल्वे लाईनवरील रेल्वे खंबा क्रमांक 309 च्या तीनजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका अंदाजे 40 वर्षीय अनोळखी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 15 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता घडली. या घटनेची माहिती रेल्वेगाडीचे लोको पायलट एस. साळुंखे यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना दिली. घटनेची माहिती मिळाल्याने पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल. पुढील तपास सहा.निरीक्षक दिलीप रोकडे करीत आहे.


कॉपी करू नका.