राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवारांच्या उपस्थितीत 21 रोजी जामनेरात कार्यकर्ता मेळावा

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ होणार कार्यकर्ता संवाद मेळावा

0

Workers meeting at Jamnerat on 21st in the presence of NCP supremo Sharad Pawar रावेर : रावेर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवार, 21 एप्रिल रोजी जामनेर येथे येत आहेत. यावेळी आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते मार्गदर्शन करतील. दरम्यान, शरद पवारांच्या जिल्हा दौर्‍याने रावेर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

जामनेरात होणार संवाद मेळावा
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ रविवार, 21 एप्रिलला शरद पवार यांच्या उपस्थितीत जामनेर येथील भागीरथी मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता कार्यकर्ता संवाद मेळावा होईल. या मेळाव्यात शरद पवार हे महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. मेळाव्यास महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रावेर तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शिवसेना उबाठा गट जामनेर तालुका प्रमुख अ‍ॅड.ज्ञानेश्वर बोरसे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जामनेर तालुकाध्यक्ष शंकर राजपूत यांनी केले आहे.


कॉपी करू नका.