ट्रॅव्हल्स बस-क्रुझर अपघातात सात प्रवासी ठार

0

Seven passengers killed in travel bus-cruiser accident सांगली : ट्रॅव्हल्स बस व क्रुझरमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात प्रवासी ठार झाले तर 11 जखमी झाले. हा अपघात सांगली जिल्ह्यातील जांभूळवाडीनजीक बुधवारी रात्री पावणेआठ वाजता घडला. मृत व जखमी कर्नाटकातील बागलकोट व विजापूर जिल्ह्यातील असून त्यांची नावे कळू शकली नाहीत.

जागीच पाच जणांचा मृत्यू
जमखंडी (जि. बागलकोट) येथून एक ट्रॅव्हल बस, क्रूझर जीप व एक कार अशी तीन वाहने सांगली जिल्ह्यातील सावर्डे (ता. तासगाव) येथे लग्नासाठी निघाली होती. विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर जांभूळवाडी फाटा (ता. कवठेमहांकाळ) येथे आल्यानंतर जीपने ट्रॅव्हल बसला मागून जोराची धडक दिली. त्यात जीपचा चक्काचूर होऊन पाच जण जागीच ठार झाले. दोघा गंभीर जखमींचा मिरजेला उपचारास नेताना वाटेतच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत मृतांची नावे समजू शकली नाहीत.

11 जण जखमी
अपघातात रघुनाथ आण्णाप्पा सव्वाशे (रा. बिद्री), सतीश हवालदार, जानू वर्णा हवालदार, संकेत हवालदार (वय 8), संतोष हवालदार (वय 10), समर्थ हवालदार (9 वर्षे, सर्व रा. कौलगी, विजापूर), शिवाजी जाधव (21), सुश्मिता संगापूर (21, दोघे रा. तोगलबागी, ता. जमखंडी), सुजाता गळवे (24, रा. अडीहुडी, ता. जमखंडी), सुमय्या मुल्ला (19, चिकलगी, ता. जमखंडी), निवेदिता मुधोळ (19, रा. मुधोळ, महालिंगपूर) हे जखमी असून जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

 


कॉपी करू नका.