भगवान महावीर स्वामी जन्म कल्याण महोत्सव समिती अध्यक्षपदी चोरडीया

0

भुसावळ : भगवान महावीर स्वामी जन्म कल्याण महोत्सव 2024 निमित्त उत्सव समिती गठीत करण्यात आली व कार्यकारीणी गठित करण्यात आली. जगाला सत्य आणि अहिंसाचे संदेश देणारे जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या 2623 जन्मकल्याण महोत्सवानिमित्त आठवडे बाजारातील दिगंबर जैन मंदिरात सकल जैन समाजाची बैठक झाली. यावेळी नूतन कार्यकारिणी समिती गठीत करण्यात आली.

अशी आहे कार्यकारीणी
अध्यक्ष- सुमित चोरडिया, उपाध्यक्ष- प्रशांत बजाज व राजेश गेलडा, कोषाध्यक्ष- देवेंद्र मेहता, संजय चोरडीया, जितेश अवतारे यांची निवड करण्यात आली. यावेळी जे.बी.कोटेचा, सतीश साखरे, चेतन जैन हेमावत, गौतम चोरडिया, अजय कासलीवाल, रमेश अन्नदाते, दीपक काठे, प्रदीप गोसावी, महेंद्र कासलीवाल, भूषण चोरडिया, समकित सिसोदिया, गजेंद्र रूईकर, सतीश गोसावी, अल्केश झांबड, कांतीलाल चोरडिया, संजय कोटेचा, योगेश वासकर, शुभम ललवाणी, अमोल वासकर, देवेंद्र निमाणी, राजेश बाफना, अभय सुराणा, विजय अंबेकर, सतीश सोनसले आदी समाजबांधवांची उपस्थिती होती.


कॉपी करू नका.