नाशिक लोकसभेतून माघार घेतल्यानंतर मंत्री छगन भूजबळांनी मांडली ही भूमिका

0

Minister Chhagan Bhujabal presented this position after withdrawing from the Nashik Lok Sabha मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांनी अचानक नाशिक लोकसभेतून माघार घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, मी नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करावी असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांनी सुचवलं होत. त्यांनी त्यांनी दाखवलेल्या आग्रहाबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. नाशिकच्या विकासाकडे बघून मराठा समाजासह विविध समाज बांधवांनी विविध पक्षांच्या नेत्यांनी पदाधिकार्‍यांनी मला जो पाठिंबा दिला त्यांचेही आभार मानतो मात्र आता आपण महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होऊन महायुतीची ताकद अधिक वाढवणार आहोत. मुंबई येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका मांडली.

दिल्लीवरून माझ्या उमेदवारीचा निरोप
ते म्हणाले की, होळीच्या दिवशी अजितदादांचा निरोप आला म्हणून आम्ही त्यांची भेट घेतली त्यांनी दिल्लीचा निरोप दिला. गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीमध्ये नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली तेव्हा अजितदादांनी समीर भुजबळ यांच्यासाठी जागा मागितली परंतु अमित शहा यांनी माझं नाव सांगितले. त्यानंतर निर्णय घेण्यासाठी मी एक दिवसाची वेळ मागितली. मात्र दुसर्‍या दिवशीही माझंच नाव फायनल झाल्याचं मला सांगण्यात आलं. त्यामुळे मी नाशिकला येऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून मते जाणून घेतली. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

संदिग्धता दूर करण्यासाठी घेतली माघार
ते म्हणाले की, नाशिकमध्ये माझी विविध पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला. नाशिकच्या विकासासाठी मराठा, दलीत, ब्राम्हण, ओबीसी यासह सर्व समाजाने नाशिकच्या विकासासाठी पाठिंबा दिला. त्यानुसार आम्ही तयारी करण्यास सुरुवात केली. मात्र तीन आठवड्याचा वेळ होऊन उमेदवारी जाहीर झाली नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार देखील सुरू झाला असून तीन आठवड्यापासून ते मतदारसंघात फिरत असून त्यांचा प्रचार पुढे गेला आहे. अधिक उशीर होत असल्याने महायुतीचे नुकसान होऊ शकत त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्वांच्या मनातील संदिग्धता दूर करण्यासाठी नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असल्याचे स्पष्ट केले.


कॉपी करू नका.