भुसावळात भगवान महावीर स्वामी जन्म महोत्सवानिमित्त सायकल रॅली

0

भुसावळ : जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर *भगवान महावीर स्वामी यांच्या 2633 वा जन्म कल्याण महोत्सवानिमित्त शहरातून अहिंसा सायकल रॅली काढण्यात आली. शनिवार, 20 रोजी सकाळी सकल जैन समाज भुसावळतर्फे निघालेल्या अहिंसा रॅली (सायकल रॅली) त सर्व समाजबांधव, महिला तसेच लहान बालकांचा समावेश होता.

पुरस्काराने गौरव
शनिवारी सकाळी 6. 45 वाजता नाहाटा महाविद्यालयाकडून रॅलीला सुरूवात झाली. जामनेर रोड, पांडुरंग टॉकीज, रेल्वे स्टेशन, भगवान महावीर मार्ग, जुने दिगंबर जैन मंदिर, डिस्को टॅावर, भिरुड हॉस्पिटलमार्गे भगवान शीतलनाथ श्वेतांबर जैन मंदिर, मातृभूमी चौकात रॅली आल्यानंतर तिचा समारोप झाला.

सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या समाज बांधवांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. सुजल जैन यांना प्रथम पारितोषिक म्हणून सायकल तसेच अमोल वास्कर, अभय सुराणा, सायली सैतवाल, रानी कोटेचा अश्या पाच विजेत्यांना, भगवान महावीर जन्मकल्यानात महोत्सव समितीकडून विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले.


कॉपी करू नका.