महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या संपर्क कार्यालयाचे अमळनेरात उद्घाटन

0

अमळनेर : जळगाव लोकसभेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच अमळनेर शहरात करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्याआधी स्टेशन रोड, कोर्टाच्यासमोर आई तुळजा भवानी, छत्रपती शिवराय आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमा पूजन करून माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील आणि डॉ.अनिल शिंदे यांच्याहस्ते संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा झाला.

याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी.के.सूर्यवंशी, शहाराध्यक्ष मनोज बापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सचिन पाटील, शहराध्यक्ष श्याम पाटील, तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील, शहरप्रमुख चंद्रशेखर भावसार, शेतकरी नेते सुभाष जिभाऊ पाटील, माजी नगरसेवक दादा पवार, प्रताप शिंपी, संदीप घोरपडे, बाळासाहेब पाटील, युवा नेते गुड्डूभाऊ देशमुख, गोकुळ आबा बोरसे, ज्येष्ठ शिवसैनिक अ‍ॅड.शकील काझी, मुन्नाभाई शेख, अनंत निकम, रवींद्र पाटील, रफिक मिस्तरी, लतीफ दादा, फिरोज मिस्तरी, अ‍ॅड.रजाक शेख, अजहर भाई सैय्यद, शिवसेना निरीक्षक कारभारी आहेर, देवेंद्र देशमुख, मोहन भोई, आम आदमी पार्टीचे प्रा.गणेश पवार व कार्यकर्ते, प्रा.पंकज पाटील, हिंमत पाटील आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कॉपी करू नका.