गोरखपूर, दानापूरला विशेष उन्हाळी रेल्वे गाड्या सोडणार

0

Special summer train trains will leave for Gorakhpur, Danapur भुसावळ : रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून मुंबई येथून गोरखपूर व दानापूरसाठी तीन जोड्या अतिरीक्त उन्हाळी रेल्वे गाड्या विशेष चालविल्या जाणार आहे. यामुळे भुसावळ विभागातील प्रवाशांना या गाड्यांचा लाभ मिळणार आहे.

विशेष गाड्यांचा प्रवाशांना दिलासा
मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात मुंबई येथून उत्तरेकडे जाणार्‍या प्रवाशांच्या मागणीची दखल घेत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई-गोरखपूर आणि मुंबई-दानापूर दरम्यान तीन अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष ही 01083 विशेष गाडी शनिवारी दि. 20 एप्रिलला रात्री 11.50 वाजता सुटेल व तिसर्‍या दिवशी सकाळी 9.30 वाजता गोरखपूर येथे पोहोचणार आहे. 01084 विशेष गाडी सोमवार, 22 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वाजता गोरखपुरहून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसर्‍या दिवशी रात्री 12.25 वाजता पोहोचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओराई, कानपुर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती येथे थांबणार आहे. या गाडीला 18 डबे असतील. 01085 विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईहुन रविवार,21 एप्रिलला रात्री 11.50 वाजता सुटली तिसर्‍या दिवशी सकाळी 9.30 वाजता गोरखपूर येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात 01086 विशेष गाडी मंगळवार, 23 एप्रिलला दुपारी 3.30 वाजता गोरखपुर येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसर्‍या दिवशी रात्री 12.25 वाजता पोहोचेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर विशेष गाडी
01081 विशेष गाडी रविवार, 21 एप्रिलला सकाळी 10.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सुटली आणि दुसर्‍या दिवशी संध्याकाळी सात वाजता दानापूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी 01082 विशेष गाडी सोमवार, 22 एप्रिलला रात्री 10 वाजता दानापुरहून सुटेल आणि तिसर्‍या दिवशी पहाटे 4.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला पोहोचणार आहे. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपुर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी आणि पं.दीनदयाल उपाध्याय जंक्शन येथे थांबेल.


कॉपी करू नका.