प्रवाशांच्या सुविधेसाठी संबलपूर-पुणे विशेष उन्हाळी रेल्वे गाडी धावणार

0

Sambalpur-Pune special summer train will run for the convenience of passengers भुसावळ : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाद्वारे संबळपूर ते पुणे दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भुसावळसह विभागातील प्रवाशांना पुणे जाण्यासाठी गाडीची सुविधा मिळणार आहे.

प्रवाशांना मोठा दिलासा
संबलपूर-पुणे ही 08327 ही साप्ताहिक विशेष गाडी प्रत्येक रविवारी 14 एप्रिल ते 30 जून या काळात संबळपूर येथून रात्री 10 वाजता सुटेल. तिसर्‍या दिवशी पहाटे 2.45 वाजता पोहोचणार आहे. या गाडीच्या 12 फेर्‍या होतील तसेच साप्ताहिक विशेष गाडी 08328 ही दर मंगळवार, 16 एप्रिल ते 2 जुलै या काळात पुणे येथून सकाळी 9.15 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी संबळपूरला पोचेल. या गाडीच्या 12 फेर्‍या होतील. या गाडीला बारगढ रोड, बालनगीर, टिटलागढ, कांताबाजी, खारियार रोड, महासुमुंड, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगांव, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाइन या स्थानकांवर थांबणार आहे. प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


कॉपी करू नका.