रावेर तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी मतदारांच्या घेतल्या गाठी-भेटी

0

रावेर : रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी सोमवारी रावेर तालुक्यातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. . मतदारांच्या भेटी घेत असतांना अचानक पाऊस सुरू झाला मात्र न थांबता त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधला. यावेळी सोबत असलेले आमदार शिरीष चौधरी यांनी श्रीराम पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे नागरिकांना आवाहन केले.

या गावांना दिल्या भेटी
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी रावेर तालुक्यातील भोकरी, केऱ्हाळा, अहिरवाडी, करजोद, खानापूर, वाघोड, मोरगाव, खिरवड येथील मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादी किसान जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, शिवसेना (उबाठा गट) जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वघटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कॉपी करू नका.