आदिशक्ती एकवीरा मातेचे मविआचे उमेदवार करण पाटील यांनी घेतले आशीर्वाद

0

जळगाव : जळगाव तालुक्यातील आमोदा बु.॥ गावाचे ग्रामदैवत आदिशक्ती एकवीरा माता यात्रोत्सवाला नुकतीच सुरूवात झाली असून सोमवारी, 22 रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील, खासदार उन्मेष पाटील यांनी यात्रोत्सवात सहभागी होवून आई एकविरा मातेचे दर्शन घेतले व विजयासाठी साकडे घातले.

पहाटेच्या मिरवणुकीत सहभाग
पहाटे चार वाजता गावातून काढण्यात आलेल्या मातेच्या पालखी मिरवणुकीत देखील करण पाटील, खासदार उन्मेष पाटील यांनी सहभागी होत ठेका धरला. पालखी आदिशक्ती एकविरा मातेच्या मंदिरावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी करण पाटील यांच्याहस्ते आरती करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जळगाव तालुका उपसंघटक शरद पाटील, सरपंच विजय सूर्यवंशी, उपसरपंच सुनंदा सुर्यवंशी, माजी सरपंच विकास सुर्यवंशी, बंडू सुर्यवंशी, छगन सुर्यवंशी, मनोहर पाटील (जामोद), मंदिराचे पुजारी गोपाल जोशी, धनंजय जोशी, मोहन जोशी, सेवेकरी रमेश सुर्यवंशी, जामोद सरपंच सतीलाला पाटील, कांतीलाल सुर्यवंशी, विजय सुर्यवंशी, महेंद्र सोनवणे, उमेश सोनवणे, बाळू आहिरे यांसह आई एकविरा मित्र मंडळ, आई एकवीरा भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, वा. जे. ग्रुप, श्री. स्वामी समर्थ ग्रुप, जय गुरूदेव परिवार, एकलव्य ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कॉपी करू नका.