महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील यांच्या प्रचारार्थ धरणगावात निघाली मशाल रॅली

0

A torch rally started in Dharangaon for the campaign of Mahavikas Aghadi candidate Karan Patil धरणगाव : धरणगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील यांचे प्रचारार्थ मशाल पेटवून गावातून मंगळवारी प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान गावातील घरोघरी जावून मतदार राजांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत करण पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, उपजिल्हा प्रमुख अ‍ॅड.शरद माळी, संघटक राजेंद्र ठाकरे, शिवसेना तालुका प्रमुख जयदीप पाटील, राष्ट्रवादी तालुकाप्रमुख धनराज माळी सर, काँग्रसचे तालुकाप्रमुख व्ही.डी.पाटील, शहरप्रमुख भागवत चौधरी, युवासेना उपजिल्हा प्रमुख हेमंत महाजन, युवा सेना जिल्हा संघटक विनोद रोकडे, युवा सेना तालुका प्रमुख स्वप्नील परदेशी, शहरप्रमुख परमेश्वर महाजन, शेतकरी संघटना तालुका प्रमुख विजय पाटील यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आम आदमी पक्ष, शेतकरी कामगार पक्षाचे तसेच मित्र पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


कॉपी करू नका.