महाविकास आघाडीतील जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पाटील उद्या उमेदवारी अर्ज भरणार

0

जळगाव : जळगाव लोकसभेतील महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील उमेदवार करण पवार (पाटील) हे हजारो समर्थकांसह बुधवार, 24 रोजी सकाळी आपलाा उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. याचवेळी रावेर लोकसभेचे उमेदवारी श्रीराम पाटील देखील उमेदवारी अर्ज भरणार असल्याने महाविकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शनाचे नियोजन केले आहे.

एकाचवेळी दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करणार
महाविकास आघाडीने करण पाटील यांना जळगावातून तर श्रीराम पाटील यांना रावेरातून मैदानात उतरवले असून दोन्ही उमेदवारांनी गाठीभेटींसह मेळाव्याच्या माध्यमातून प्रचार सुरू देखील केलेला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात मंगळवार दिनांक 24 रोजी मविआचे दोन्ही उमेदवार आपापला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

या नेत्यांची असेल उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड व शिवसेनेचे (उबाठा गट) युवा नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. याप्रसंगी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खर्‍या अर्थाने प्रचारात रंगत येणार आहे.


कॉपी करू नका.