एरंडोल तालुक्यात महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी घेतल्या मतदारांच्या गाठी-भेटी

0

चाळीसगाव : जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा, वैजनाथ, खेडी, कढोली, दापोरी, रवंजे बु, रवंजे खु, खर्ची खु, खर्ची बु, रिंगणगांव, सावदा व विखरण येथे प्रचार दौरा केला. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदाम राक्षे, शिवसेना तालुकासंघटक संभाआबा पाटील, शिवसेना एरंडोल तालुकाप्रमुख रवी जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी तालुकाप्रमुख बबलू पाटील, एरंडोल माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, भाजपा माजी तालुकाध्यक्ष एस.आर.बापू पाटील, एरंडोल शेतकी संघाचे संचालक संभाजी चव्हाण, एरंडोल माजी नगरसेवक जगदीश ठाकुर, निलेश परदेशी, माजी नगरसेविका छाया दाभाडे, सुनील, माजी पंचायत समितीचे माजी सदस्य नाना कोळी, शिवसेना शहरसंघटक मयूर महाजन, पिंटु राजपुत, शाम ठाकुर, नरेश ठाकरे, प्रवराज पाटील यांच्यासह भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी व मित्र पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते, स्थानिक गावांचे आजी-माजी सरपंंच, उपसरपंच, सदस्य, विकासो आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.


कॉपी करू नका.