जळगावात महाविकास आघाडीच्या रॅलीला सुरूवात

करण पवार व श्रीराम पाटील यांचे अर्ज होणार दाखल : राज्यातील नेत्यांची उपस्थिती

0

जळगाव : जळगाव व रावेर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवारी करण पवार (पाटील) आणि श्रीराम पाटील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांसमवेत रॅलीद्वारे निघाले आहे. बुधवारी दुपारी शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली.

राज्यातील नेत्यांची उपस्थिती
अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जेष्ठ नेत्या वैशाली सूर्यवंशी, महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख बुलाबराव वाघ आदी प्रमुख नेत्यांसह महाविकास आघाडीतील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शेतकरी कामगार पक्ष, तसेच इतर सर्व पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.


कॉपी करू नका.