खासदार रक्षा खडसे व स्मिता वाघ उद्या उमेदवारी अर्ज भरणार

महायुतीच्या नेत्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांची राहणार उपस्थिती

0

MPs Raksha Khadse and Smita Wagh will file nomination papers tomorrow जळगाव : जळगावसह रावेर लोकसभेतील महायुतीचे उमेदवार खासदार रक्षा खडसे व स्मिता वाघ हे शक्ती प्रदर्शन करीत गुरुवार, 25 रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील मंत्री, आमदार आदींची उपस्थिती असणार आहे.

शिवतीर्थापासून उद्या निघणार शक्तीप्रदर्शन रॅली
महायुतीतील घटक पक्ष भाजपाचे जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार स्मिता वाघ व खासदार रक्षा खडसे हे गुरुवार, 25 एप्रिल रोजी नामनिर्देशन अर्ज भरणार आहेत. त्यांची शहरातील शिवतीर्थ येथून नामांकन रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजूमामा भोळे, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार लता सोनवणे, आमदार संजय सावकारे यांच्यासह जिल्हाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


कॉपी करू नका.