बोदवड पंचायत समितीत भरवणार ‘सभापती दरबार’


सभापती किशोर गायकवाड : नागरीकांच्या तक्रारी सुटण्यासाठी पुढाकार

बोदवड : तालुक्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या पंचायत समितीत तालुकाभरातील नागरीक विविध तक्रारी व समस्या घेऊन येतात मात्र अनेकवेळा या तक्रारींचे वेळेवर निसरन होत नसल्याने नागरीकांच्या पैशांसह वेळेचा अपव्यय होत असल्याने पंचायत समिती स्तरावरच नागरीकांच्या समस्या व प्रश्न ऐकून घेण्यासाठी येथील सभापती किशोर गायकवाड यांनी लवकरच सभापती दरबार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या सभापती दरबारात तक्रारदारांबरोबर सविस्तर चर्चा करून त्यांच्या समस्येचे जागेवर निसरन केले जाईल शिवाय तक्रार जाणून घेतली जाणार आहे.

गोरगरीबांना न्याय मिळण्यासाठी सभापती दरबार
अनेकवेळा तालुका प्रशासकीय स्तरावर जनतेच्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही. परीमाणी त्यांना वारंवार तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पंचायत समितीत नाहक चकरा माराव्या लागतात त्यामुळे तालुक्यातील गोरंगरीब वंचित व पात्र लोकांची यापासून मुक्तता व्हावी व त्यांचे प्रश्न व विविध प्रकारच्या तक्रारी तसेंच त्यांना भेडसावत असलेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी ‘सभापती दरबार’ घेण्याचा उद्देश असल्याचे मत सभापती गायकवाड यांनी व्यक्त केले. अनेकदा पंचायत समिती स्तरावर विविध लोकांच्या तक्रारी व प्रश्न अनेक दिवसांपासून धूळखात पडून असल्याने जनमानसात प्रशासनाबद्दल रोष व्यक्त केला जात असतो त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांचे दुर्लक्ष व तक्रारींना न्याय न मिळाल्याने परीमाणी तक्रारदार पंचायत समिती स्तरावरून सुटणारे प्रश्न व समस्या मार्गी लागाव्या म्हणून जिल्हा स्तरावरून पाठपुरावा करून न्याय मिळण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. हे लक्षात घेता पंचायत समिती स्तरावरील विविध समस्या, प्रश्न समजून घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी त्या विभागाच्या जबाबदार अधिकार्‍यांना सूचना करीत प्रलंबित समस्या या सभापती दरबाराच्या माध्यमातून मार्गी लावल्या जाणार असून याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असेही सभापती गायकवाड यांनी सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !