खासदार रक्षा खडसेंनी घेतले सासरे नाथाभाऊंचे आशीर्वाद

0

मुक्ताईनगर : जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आज गुरुवारी शक्तीप्रदर्शन करीत आपले अर्ज दाखल करणार आहे. रावेर लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी त्यांचे सासरे आमदार एकनाथ खडसे यांचे गुरुवारी आशीर्वाद घेतले.

शक्ती प्रदर्शनानंतर दाखल होईल अर्ज
भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रावेर व जळगाव महायुतीचे उमेदवार आपले अर्ज दाखल करणार आहेत. भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या घटक पक्षांकडून यावेळी भव्य शक्तिप्रदर्शन देखील करण्यात येणार आहे. भाजपा कार्यालय (जी.एम. फाउंडेशन) ते जिल्हाधिकारी कार्यालय, अशी भव्य पदयात्रा थोड्याच वेळात निघणार आहे.


कॉपी करू नका.