जळगावात वखारीला आग
जळगाव : शहरातील कानळदा रस्त्यावरील शिवाजी नगरात असलेल्या योगेश्वर टिंबर या लाकडाच्या वखारीला बुधवारी रात्री 12 वाजता अचानक आग लागल्याने लाकूड, फर्निचर तसेच लाकडाचे इतर साहित्य जळून खाक झाले. शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याचा अंदाज आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी सुरेश वाणी, मदन दराळे, बाळू पोळ व नामदेव पोळ यांच्यासह नागरिकांनी मिळेल तेथून पाणी आणून आग विझवली. दरम्यान, या आगीत नुकसानीचा नेमका आकडा कळू शकला नाही. घटना वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. या भागातील वीजपुरवठा आगीमुळे खंडित करण्यात आला.

