रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी शक्ती प्रदर्शनानंतर दाखल केला उमेदवारी अर्ज

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजनांसह अन्य मंत्री व आमदारांची उपस्थिती

0

जळगाव : रावेर लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी गुरुवारी हजारो पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत विराट शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला.

विराट रॅलीने वेधले लक्ष
यावेळी महायुतीच्या पदाधिकारी यांनी भव्य रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी झालेल्या जाहीर सभेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी तसेच महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे व जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी प्रत्येक बुथवर जास्तीतजास्त मतदानसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी पदाधिकार्‍यांनी केले.

या पदाधिकार्‍यांची उपस्थिती
यावेळी महायुतीच्या रावेरच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे व जळगावच्या स्मिताताई वाघ यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीष महाजन, मंत्रीगुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील तसेच महायुती व मित्र पक्षातील आमदार, सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कॉपी करू नका.