उत्कृष्ट कामगिरीची दखल : जळगाव जिल्ह्यातील 11 कर्मचार्‍यांना पोलीस महासंचालक चिन्ह जाहीर

0

Commendation for outstanding performance : 11 employees of Jalgaon district were awarded Director General of Police insignia जळगाव : जळगाव जिल्ह्यातील 11 अधिकारी व कर्मचार्‍यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. जिल्हा पोलीस दलात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाची घोषणा केली.

यांना जाहीर झाले पोलीस महासंचालक चिन्ह
राज्य शासनाच्या गृह विभागाने गुरुवार, 25 रोजी या पदकांची घोषणा केली. त्यात जळगाव पोलीस दलातील संजय नारायण हिवरकर, मीनल श्रीकांत साकळीकर, राजेश पंडित पाटील, दीपक देवराम चौधरी, विजय नामदेव सोनवणे, प्रवीणा गजानन जाधव, महेश अरविंद बागुल, शकिल अहमद शब्बीर शेख, राजेश शाहू पाटील तसेच भुसावळ शहरचे एएसआय मोहम्मदअली सत्तारअली सैयद, भुसावळचे हवालदार संजय राजाराम पाटील यांचा समावेश आहे.


कॉपी करू नका.