रावेर लोकसभेतील मोठ्या गावांमध्ये ‘स्मार्ट व्हिलेज’ योजना राबवणार !

राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील : भुसावळ तालुक्यात प्रचार दौरा

0

भुसावळ : रावेर लोकसभेतील मोठ्या गावांमध्ये ‘स्मार्ट व्हिलेज’ योजना राबवण्यात येईल तसेच तळागाळातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, आदिवासी, वृद्ध महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न आगामी काळात केला जाईल, असे आश्वासन महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले. रावेर लोकसभा मतदार संघातील भुसावळ तालुक्यातील अनेक गावांना शुक्रवारी पाटील यांनी भेटी दिल्या व नागरिकांशी संवाद साधला.

नागरिकांशी साधला संवाद
भुसावळ तालुक्यातील साकेगाव, गोजोरा, सुनसगाव, गोंभी, वेल्हाळा, मांडवेदिगर, भिल्लमळी या गावांना पाटील यांनी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. मांडवेदिगर व भिलमळी गावातील नागरिकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. गावात घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही, वृद्ध महिलांना निराधार योजनेचा लाभ मिळत नाही, आरोग्य व्यवस्था नाही, डोंगराळ भाग असल्याने शेतमाल वाहतुकीसाठी व्यवस्था नाही, अशा समस्या मांडण्यात आल्या. यावेळी श्रीराम पाटील यांना विजयाचे आशीर्वाद देणयत आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी जळगाव जिल्हा शिवसेना उपप्रमुख मुळे बाबा, तालुकाप्रमुख भुसावळ संतोष सोनवणे, विधानसभा क्षेत्र संघटक राजूभाऊ इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी दीपक मराठे, वाय.आर.पाटील, नाना पवार, शकील पटेल, बंडू पाटील, आर.सी.पवार, नामदेव भोई, अमोल मांडे, विजय कोळे, चंद्रकांत निकम, अर्जुन उपासे, विनोद पवार, पिंटू पाटील, पप्पू जकात, काँग्रेसचे योगेंद्रसिंग पाटील, पंकज पाटील, अशफाक काजी, अतुल चौधरी, आयुष पाटील, धनराज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. मित्रपरिवार कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते.

गोजोरा येथील भेटीत गावातील ज्येष्ठ नागरिक नथू सोनवणे, आत्माराम डोळे, शांताराम डोळे, जीवन जावळे, भिका डोळे, नारायण तळेले तर सुनसगाव येथे लक्ष्मण कोळी, तानाजी पाटील, सुनील सोनवणे, संजय पाटील, अनिल पाटील, वनराज तळेले, सागर चौधरी, दिगंबर पाटील, वाल्मीक दोडे, संजय पाटील, ईश्वर कोळी, प्रमोद पाटील, चेतन कोळी, योगेश पाटील, संदीप कोळी, कुंदन पाटील, लिलाधर कोळी, विजय कोळी गावातील नागरिक उपस्थित होते. मांडवे दिगर येथे कैलास जाधव शिवसेना गणप्रमुख, विशाल पवार जिल्हाध्यक्ष सेवालाल, सैनिक सुरेश वाघ, गोपी पवार, सुरेश जाधव, विक्रम पवार, ताराचंद पवार, संतोष जाधव, रमेश पवार, आप्पा पवार, मांडवे दिगर व भिलमळी गावातील ज्येष्ठ महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष व मित्रपरिवार कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते.


कॉपी करू नका.