मेहरुण तलावात बुडाल्याने प्रौढाचा मृत्यू


जळगाव : मेहरुण तलावाच्या पाण्यात बुडून मेहरुणमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. गुरुवार, 25 रोजी सकाळी नऊ वाजता ही घटना समोर आली. विलास बाळकृष्ण वाणी (49, रा.श्रीराम मंदिर चौक,मेहरुण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

एमआयडीसी पोलिसांची धाव
पाण्यात बुडत असताना काही प्रत्यक्षदर्शीनी घटना पाहिली. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांना त्यांनी माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पट्टीच्या पोहणार्‍यांना पाचारण करुन बेशुध्दावस्थेतील तत्काळ रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगडं यांनी त्यांना मृत घोषित केले. ही वार्ता कळताच वाणी कुटुंबियांसह नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. या ठिकाणी कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर होवून शोक केला.
वाणी हे एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत कामाला जावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. ते मोठे बंधू यांच्यासह ते मेहरुणमध्ये वास्तव्य करत होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !