भुसावळात रेल्वेतर्फे गोग्रीन थीमवर सायकल रॅली

डीआरएम ईती पांडे यांनी दाखविला हिरवा झेंडा

0

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मंडळ क्रीडा संघटनेततर्फे गोग्रीन थीमवर सायकल रॅलीचे आयोजन गुरुवारी सकाळी करण्यात आले. या सायकल रॅलीला डीआरएम ईती पांडे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. भुसावळ डीआरएम कार्यालय सायकल रॅलीसाठी विद्यार्थी-विद्यार्थिनी, रेल्वेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डीआरएम पांडे यांनी सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीचा शुभारंभ केला.

40 सायकलपटूंचा सहभाग
सायकल रॅलीत सुमारे 40 जणांपेक्षा जास्त जणांनी सहभाग घेतला.. ही रॅली डीआरएम कार्यालयातून सुरू होऊन आयुध निर्माणीमार्गे त्तर बाजूने भुसावळ जंक्शनवर आल्यानंतर सायकल रॅलीचा समारोप झाला. यावेळी रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी त्यांच्या कुटुंबातील सदस्य, रेल्वे शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.


कॉपी करू नका.