पूनम महाजनांचे तिकीट कापले : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

0

मुंबई : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर करीत भाजपाने विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर केल्याने पूनम महाजन यांचे तिकीट कापले गेले आहे. भाजपाने 15 वी उमेदवार यादी जाहीर केली असून यात केवळ निकम यांच्या नावाचा उल्लेख आहे. दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा देणार्‍या निकमांना भाजपाने उमेदवार घोषित करून वेगळाच संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपाने वापरले धक्कातंत्र
या मतदारसंघातून मविआने वेळ काढत माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने पुनम महाजन यांना तिकीट देण्याचे टाळले होते. काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर लगेचच दुसर्‍या दिवशी भाजपाने आपला तगडा उमेदवार जाहीर केला आहे. 2016 मध्ये निकम यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. सरकारी वकील म्हणून त्यांनी अनेक बहुचर्चित खटल्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. आता मुंबईतही भाजपाने मविआला कांटे की टक्कर दिली आहे.

 


कॉपी करू नका.