भुसावळात पालिका पथकाकडून 42 किलो प्लॅटीक पिशव्या जप्त


भुसावळ : प्लॅस्टीक कॅरीबॅगवर बंदी असतानाही शहरात व्यावसायीकांकडून कॅरीबॅगचा थेट वापर होत असल्याने पालिकेच्या मुख्याधिकारी करूणा डहाळे यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त केलेल्या पथकाने बुधवारी शहरातील दोन व्यापार्‍यांकडे अचानक तपासणी करीत सुमारे 42 किलो प्लॅस्टीक जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. या व्यापार्‍यांकडून 15 हजार रूपयांचा दंड करण्यात आला आहे.

अचानक तपासणीमुळे खळबळ
शहरातील बाजारपेठेत बंदी असलेल्या सिंगल युज प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा साठा उपयोग करणार्‍या दुकानांवर बुधवारी सायंकाळी अचानक तपासणी सुरू केल्यानंतर निलेश अग्रवाल व सुनील हंसराणी यांच्या दोन दुकानांमध्ये बंदी असतांनाही सिंगल युज प्लॅस्टिक आढळल्यानंतर प्रत्येकी पाच हजार रुपयेप्रमाणे 10 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पथकातील सदस्यांनी 42 किलो प्लॅस्टिक सुद्धा जप्त केले. ही कारवाई पाणीपुरवठा अभियंता नितीन लुंगे, स्वच्छता निरीक्षक प्रदीप पवार, वसंत राठोड, निवृत्ती पाटील, कार्यालय अधीक्षक महेंद्र कातोरे आदींनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !