पाळधीनजीक टायर फुटताच खाजगी ट्रॅव्हल्स उलटली : सहा प्रवासी जखमी

0

Private Travels Overturned As Tire Burst Near Police Station : Six Passengers Injured जळगाव : सुरतहून अकोल्याकडून निघालेल्या भरधाव ट्रॅव्हल्सचे अचानक टायर फुटल्याने नियंत्रण सुटून खाजगी बस उलटली. राष्ट्रीय महामार्गावरील पाळधीजवळ हा अपघात शनिवार, 27 एप्रिल रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात एकाचे दोन्ही पाय फॅक्चर झाले तर अन्य पाच जणदेखील जखमी झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धाव घेऊन जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याकामी मदत केली.

टायर फुटताच बस उलटून अपघात
सुरत येथून अकोल्याकडे प्रवाशांना घेवून निघालेली खाजगी बस (ए.आर.01 पी.7281) ही शनिवार, 27 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसरात आल्यानंतर तिचे टायर फुटले व नियंत्रण सुटताच बस उलटली. या अपघातात पठाण गफार खान (46, रा.सुरत) यांचे दोन्ही पाय फॅक्चर झाले तर कौतीक सुपडा गवळी (50, रा.सुरत), सोनू अंकुश मिस्तरी (27, सुरत), आशाबाई सुभाष भोसले (45, रा सुरत), विद्या स्वामी निकडे (40), अर्चना स्वामी निकडे (12, रा.बुलढाणा) हे जखमी झाले. अपघात झाला त्यावेळी अनेक प्रवासी गाढ झोपेतच होते.

 


कॉपी करू नका.