नरेंद्र मोदीजींनी तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला पुन्हा संधी द्या

खासदार रक्षाताई खडसे : रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रचार दौरा

0

रावेर : रावेर लोकसभेच्या महायुती व भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी रविवारी रावेर तालुक्यातील वाघोदा बु.॥, चिनावल, कोचुर बु.॥, कोचुर खु.॥, रोझोदा, खिरोदा प्र.यावल आदी गावात सकाळी प्रचार दौरा केला. यावेळी ग्रामस्थांच्या त्यांनी भेटी-गाठी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले.

रावेर तालुक्यात मतदारांनी दिले आशीर्वाद
रावेर लोकसभा निवडणुकीत भाजपा व महायुती अधिकृत उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी रविवारी रावेर तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्र पक्षाच्ील पदाधिकार्‍यांसह रावेर तालुक्यातील मौजे वाघोदा बु.॥, चिनावल, कोचुर बु.॥, कोचुर खु.॥, रोझोदा, खिरोदा प्र.यावल आदी गावांमध्ये प्रचारार्थ भेट देऊन, मतदारांशी संवाद साधला. गेल्या दहा वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी जास्तीत-जास्त संख्येने भाजपाला मतदान करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.


कॉपी करू नका.