आडगावातील पितृछत्र हरवलेल्या दुर्गाच्या लग्नात शिवनेरी फाउंडेशनची शिदोरी

नेहमी अडल्या-नडल्यांच्या मागे उभे राहतात म्हणून विरोधक मंगेशदादांवर जळतात..! आमदार मंगेशदादा व सौ.प्रतिभाताई चव्हाण यांच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक

0

चाळीसगाव : आडगाव येथील गरीब शेतमजूर कै.बापू रामदास हांबरे (गोपाळ) यांचे काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे अकाली निधन झाले. पत्नी, तीन मुली व एक लहान मुलगा असा परिवार असणार्‍या कै. बापू यांची लहान मुलगी .दुर्गा हिचे लग्न 2 मे रोजी ठरले असून ऐन लग्नाच्या महिनाभर अगोदर हा दुःखाचा डोंगर त्यांच्या कुटुंबावर कोसळला. कै.बापूंच्या उपचारासाठी देखील मोठा खर्च लागल्याने गोपाळ कुटुंबाच्या पुढे दुर्गाचे ठरलेले लग्न कसे पार पाडावे ? हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. गोपाळ कुटुंबाची ही दुःखद कथा शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई मंगेशदादा चव्हाण यांना कळाली असता त्यांनी सदर कुटुंबाला आधार देण्याचा निर्णय घेतला. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने दुर्गाच्या लग्नातील 1000 वर्‍हाडी लोकांच्या जेवणाचा किराणा बाजार घरपोच सुपूर्द करण्यात आला.

चव्हाण दाम्पत्याच्या दातृत्वाचे कौतुक
पतीचे निधनाचे दुःख व तोंडावर आलेले मुलीचे लग्न या विवंचनेत असलेल्या त्या मायमाऊलीला या मदतीमुळे मोठा आधार मिळाला आहे. यामुळे आमदार मंगेशदादा व सौ.प्रतिभाताई चव्हाण यांच्या दातृत्वाचे मोठे कौतुक होत असून हे दाम्पत्य नेहमीच तालुक्यातील संकटात अडल्या नडल्या निराधारांच्या पाठीमागे उभे राहत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. दरम्यान, विरोधकांना त्यांच्या कामाची, दातृत्वाची बरोबरी करता येत नसल्याने ते नेहमीच मंगेशदादा व प्रतिभाताई यांच्या कार्यावर जळतात हेदेखील तेव्हढेच खरे !


कॉपी करू नका.